About us

कितीवेळा आपल्याला असं वाटतं कि आपल्याला अमुक एक मुद्द्यावर रोखठोक मत मांडायचं आहे, वाचायचं आहे? आजकालच्या लेफ्ट-राईट, भक्त-अभक्त, पुरोगामी-प्रतिगामी अशा असंख्य विभाजनात कुणीही निर्भीड राहून एखाद्या मुद्द्यावर रोखठोक परखड मत मांडताना दिसतच नाही. जवळपास सर्वच ठिकाणी कुना एकाकडे झुकतं पारडं ठेवलं जातं आणि आपलीच बाजू उजवी कशी ह्याचा अट्टाहास सुरु होतो. त्यापुढे जाऊन दुसरी बाजू कशी सर्वस्वी चूक हे दाखवणं आणि आपलंच घोडं दामटनं असा एकंदर आलेख असतो. पण एक त्रयस्थ माध्यम बनून एखाद्या मुद्द्यावर फक्त आणि फक्त चूक कि बरोबर ह्या एकमेव मुद्द्यावर रोखठोक मत केव्हा मांडलं जाणार? हे झालं सरळ सरळ राजकीय असणारे विषय किंवा त्या अनुषंगाने जाणारे विषय. माणूस म्हणून समाजात वावरताना, चालताना, बोलताना अशा सर्वच ठिकाणी असे कित्येक मुद्दे असतात कि जिथे रोखठोक बोलायलाच हवं, व्यक्त व्हायला हवं, अन्यायाविरुद्ध परखड वाचा फोडायलाच हवी. मग ते रस्ते असोत कि रस्त्यावरचे खड्डे असोत, रोजच्या पाण्याचा मुद्दा असो कि टँकर माफियांचा हैदोस असो, सरकारी कार्यालयामधला गोंधळ आणि भ्रष्टाचार असो कि खाजगी कंपन्यांमधला, गळचेपी ते मुस्कटदाबी, असे रोजच्या जीवनातले अनेक मुद्दे जिथे हवं आहे रोखठोक मत! म्हणूनच आम्ही घेऊन येत आहोत रोखठोकमत.कॉम. जिथे आम्ही बोलू तुमच्या आमच्या प्रश्नांवर आणि मुद्यावर परखडपणे, कोणतीही बाजू न घेता अगदी 'रोखठोक'.